आर्थिक व्यवहारातून एस.टी. कर्मचाऱ्यांची अपहरनानंतर हत्या
8 लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून एका 58 वर्षीय एस.टी. विभागातील कर्मचाऱ्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली.हत्येनंतर मृतदेह पोत्यात बांधून निर्जनस्थळी फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज सातारा परिसरात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपिना अटक केली आहे.
मुजीब अहेमद खान वय-58 (रा.शहनगर) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे तर आतिक काझी आणि आसिफ खान अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींचे नाव आहे.
या घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, मृत खान हे एस.टी. महामंडळामध्ये नोकरीस आहेत.ते निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने गुरुवारी ते क्रांतिचौक येथील कार्यालयात निवृत्ती नंतर लागणाऱ्या कागदपत्रांची आणि प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी गेले होते.मात्र ते घरी आलेच नाही.या बाबत नातेवाईकांनी बेपत्ता असल्याची तक्रार क्रांतिचौक पोलीस ठाण्यात दिली होती.त्यासह त्यांचा अपहरण झाल्याचा संशय देखील नातेवाईकांनी पोलिसांकडे व्यक्त केला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी या प्रकरणाच्या खोलात जाऊन माहिती मिळवली असता मृत खान यांनी 8 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार चा वाद असल्याचे समोर आले होते. शिंदे यांच्या पथकाने संशयावरून आतिक व आसिफ या दोघांना उचलले होते. त्यांना विचारपूस केली असता दोघांनीही पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.आज सकाळी पुनः दोघांकडून वेगवेगळी विचारणा करण्यात आली असता दोघांची उत्तरे वेगवेगळी असल्याने पोलिसांना संशय आला.दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी खान यांचा अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिली.व मृतदेह सातारा परिसरातील चाटे स्कुलच्या मागे पोत्यात बांधून फेकल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहितीची शहानिशा केली असता एका पोत्यात खान यांचा मृतदेह पोलिसांना दिसून आला.पोलिसांनी घटनस्थळचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी घाटी रुग्णालयात हलविले.या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खान आणि दोन्ही आरोपी मध्ये 8 लाख रुपयांचा नेमका कोणता व्यवहार होता हे समोर आले नाही.दोन्ही आरोपीनी हत्या कुठे केली,कोठून खान यांचे अपहरण करण्यात आले.व या हत्याकांडात अजून किती आरोपींचा समावेश आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली..











